Friday, April 26, 2024

/

कोविड संदर्भात या अधिकाऱ्यांची नियुक्ती

 belgaum

कोविड आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या ग्रामीण मंत्रालयाने संक्रमण प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत, राज्य सरकारने कोविड देखरेखीचे पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन आणि समन्वय यावर त्वरित प्रभाव टाकण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मुनीश मौदगील, विनूत प्रिया, शालिनी रजनीश, पंकज कुमार पांडे, प्रताप रेड्डी, पवन कुमार, विपिन सिंग, उमा महादेवन, पल्लवी अमृती, पेन्निनुराज, प्रियांका मेरी फ्रान्सिस, शिवशंकर, बिस्वजित मिश्रा हे अधिकारी कार्यरत असतील.
कोणत्याही प्रकारे संक्रमण वाढू नये यादृष्टीने या अधिकाऱ्यांना कार्यरत राहावे लागणार आहे.

 belgaum

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य विभाग तसेच नियंत्रण समितीच्या सदस्यांशी समन्वय साधून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत आहेत की नाही यासंदर्भात योग्य ते निर्णय घेण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.

संबंधित आयएएस आणि आयपीएस अधिकारी कर्नाटकात कार्यरत असले तरी केंद्र सरकारच्या समितीमार्फत यांची नियुक्ती झाली असून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचे काम ही या अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.