शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवप्रतिमेशी गैरकृत्य केलेल्यांचा निषेध-छत्रपती शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे बेंगलोर येथील सदाशिवरावनगरातील हिंदुत्वाचे प्रतीक असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अवमान केला गेला त्याचे निषेध व्यक्त करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीयांना वंदनीय आहेत.
जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासात समाविष्ट आहे.अनेक देशात छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श म्हणून पुतळे उभा केले आहेत.
बेंगलोर शहर शहाजीराजांनी वसवलं आणि त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होणे ही भारतीय संस्कृतीची हानी आहे. भारतीय सेनाही छत्रपती’ शिवाजी महाराज की जय ‘म्हणून युद्धात उतरते.भारतीय सेनेचे छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्तीस्थान आहे. अशा या युगपुरुषाचा कोणत्याही पद्धतीने अपमान करणे हे सडक्या मनोवृत्तीचे लक्षण आहे.
नव्या पिढीसाठी शिवजयंतीउत्सव चित्ररथाच्या माध्यमातून आम्ही छत्रपतींचा आदर्श मांडतो. त्या आमच्या मानबिंदूला ठेच पोहचविण्याचे ज्यांनी हीन कृत्य केले त्यांचा आम्ही शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने निषेध करतो,असे शिवजयंती चित्ररथमहामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे.बी शहापूरकर, रवी निर्मलकर, मेघन लंगरखंडे, रवींद्र जाधव संजय नाईक, नितीन जाधव, संतोष कणेरी, विनायक बावडेकर , आदित्य पाटील यांनी केले आहे