Saturday, July 27, 2024

/

वाटाळ नागराजनी दिली कर्नाटक बंदची हाक

 belgaum

बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीवर तात्काळ बंदी घालावी या मागणीसाठी कन्नड नेते वाटाळ नागराज यांनी येत्या 31 डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे.

बेळगाव येथे क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी विटंबना केली असल्याचा आरोप करून समितीवर त्वरीत बंदी घालावी अशी मागणी कन्नड नेते वाटाळ नागराज यांनी केली आहे.

तसेच आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी येत्या 31 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ‘कर्नाटक बंद’ ची हाक दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.