Saturday, April 27, 2024

/

बेळगावात उद्या प्रथमच श्री इंदोरीकर महाराजांचे किर्तन

 belgaum

बेळगाव शहरातील श्री हरी विठ्ठल रुक्मिणी अभिवृद्धि वारकरी सेवा संघातर्फे उद्या रविवार दि. 14 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता ह.भ.प. श्री इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव शहरात प्रथमच इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम होणार असून या अगोदर ते ग्रामीण भागात आले होते.

आपल्या अमोघ वाणीने संपूर्ण महाराष्ट्र गाजविणाऱ्या ह. भ. प. श्री इंदुरीकर महाराज यांचा बेळगावातील हा पहिलाच कीर्तनाचा कार्यक्रम आहे. श्री इंदुरीकर महाराज यांच्या या कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी भाजपा ओबीसी मोर्चाचे कर्नाटक राज्य अध्यक्ष आणि विमल फाऊंडेशनचे संस्थापक किरण जाधव यांनी विषेश पुढाकार घेतला आहे. सदर कार्यक्रम आदर्श स्कुल ग्राउंड, ग्रामीण पोलीस स्टेशन समोर, वडगाव -बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी फेसमास्क नसल्यास प्रवेश नाही. सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे. 1 मीटर अंतर ठेवून बसण्यास मुभा आहे.Indorikar

 belgaum

सॅनिटायझरचा वापर करूनच कार्यक्रम स्थळी प्रवेश करावा. हे सर्वांना बंधनकारक आहे अशी संयोजक समितीची विनंती आहे. सदर कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी नागरिकांनी 8971019667 /8748036642 /9945913322 /8105855899 अथवा 9167260216 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.