Saturday, April 20, 2024

/

विधान परिषदेतही भाजपला बहुमत मिळेल-येडीयुरप्पा

 belgaum

राज्यात विधान परिषद निवडणुकीत 20 पैकी कमीत कमी 17 जागांवर विजयी होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला.चिकोडी येथे महंतेश कवटगीमठ यांच्या फार्म हाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

विधान परिषदेत एकूण 25 पैकी 20 जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे.उमेदवारांची घोषणा केलेल्या दिवसांपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. आम्ही 20 जणांची यादी जाहीर केली असली तरी काँग्रेसने अद्याप यादी जाहीर केली नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

चिकोडीत 8942 मतदार आहेत तीन वेळा विजय मिळविलेले महंतेश कवटगीमठ यांनी या मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत त्यामुळे प्रथम क्रमांकाचे उमेदवार म्हणून ते निवडून येतील असा विश्वास देखील बी एस येडीयुरप्पा यांनी यावेळी व्यक्त केला.

Yediyurappa
Cm Yediyurappa was at belgaum airport

विधान परिषदेत भाजपकडे बहुमत नाही मात्र या निवडणुकी नंतर सभागृहात भाजपकडे बहुमत असेल असेही त्यांनी म्हटले. वळीव पावसाने झालेल्या नुकसाना बद्दल मुख्यमंत्री बोम्मई यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे शेतकऱ्यांचे नुकसान नजरे पलीकडे झाले आहे केवळ निवडणूक प्रचारचं नव्हे तर शेतकऱ्यांची मदत आम्ही करत आहोत राज्य आणि केंद्र सरकार दोघानी मिळून नुकसान भरपाई देणार आहोत.

जे डी एस ने ज्या ठिकाणी उमेदवार दिले नाहीत त्या ठिकाणी त्यांची मदत भाजपने घ्यावी अशी सूचना त्यांनी केली.यावेळी महंतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.