बेळगाव येथील वकिलांची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे .20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून शनिवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी सध्या पाच जण इच्छुक आहेत. त्याचबरोबर उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी जॉइंट सेक्रेटरी आणि सदस्य या पदांसाठी अनेक जण इच्छुक असून रिंगणात उतरणार आहेत. या वर्षी निवडणूक मोठ्या चुरशीने होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
वकील मतदारांची यादी 2 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 6 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून शनिवारी सकाळी अकरापासून दुपारी 4 पर्यंत अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत.
बुधवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत अर्जांची छाननी करून वैद्य नावे जाहीर होणार आहेत.
11 नोव्हेंबर रोजी दुपारी तीनपर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी वेळ आहे. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता अंतीम उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी सहानंतर मतमोजणी होणार असून रात्री उशिरा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी संजय तुबची हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्या संदर्भातील निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून वकिलांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होणार आहे.