Friday, April 26, 2024

/

पाय घसरून तलावात पडल्याने दोघांचा मृत्यू

 belgaum

पाय घसरून तलावात पडल्याने दोघांचा मृत्यू- पाय घसरून तलावात पडलेल्या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथे आज रविवारी सकाळी घडली.

तलावात बुडालेल्या दोघांपैकी एकाचे नांव कांतेश भिमप्पा बडीगेर (वय 25, रा. कोन्नुर गोकाक) असे आहे. कांतेश सोबत बुडालेल्या दुसऱ्या युवकाचा मृतदेह तलावात शोध घेऊन बाहेर काढण्यात आला.

एम. के. हुबळी येथील तलावांमध्ये आज सकाळी दोघेजण पाय घसरून पडल्याने बुडाले असल्याची माहिती मिळताच कित्तूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवराज उळ्ळेगड्डी हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

 belgaum

त्याचप्रमाणे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तलावातील मृतदेह बाहेर काढले. मयत कांतेश बडीगेर हा काल शनिवारी सायंकाळी एम. के. हुबळी येथील आपल्या भावाच्या घरी राहण्यास आला होता. सदर घटनेची कित्तूर पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.