Friday, April 19, 2024

/

महामार्गाजवळ उसाच्या ट्रॅक्टरला टँकरची धडक बसून अपघात

 belgaum

मागून येणाऱ्या टँकरने उसाच्या ट्रॅक्टर ला धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग-4 जवळ घडली.या घटनेत दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग वरील मंजुनाथ राईस मिलजवळ हा अपघात झाला. उसाच्या ट्रॅक्टरला टँकर धडकला. यामुळे ट्रॅक्टर चालक जखमी झाला. कोणतीही जीवितहानी झाली नाही. हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

महामार्गावर अपघात होण्याच्या घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. वाहन वेगावर नियंत्रण नसताना ती चालवण्याचा प्रकार अंगलट येऊ लागला आहे.

याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या घटनेत ट्रॅक्टर चालक दगावण्याचा मोठा धोका होता मात्र सुदैवानेच तो वाचला असून अशा घटना टाळण्यासाठी आता वेग नियंत्रक बसविण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.