Saturday, April 27, 2024

/

धरणात बुडून सतरा वर्षीय बालकाचा मृत्यू

 belgaum

सतरा वर्षीय मुलाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील खादरवाडी गावात घडली आहे.अहमद मोहम्मद कासिम शेख वय 17 रा. हुंचेनहट्टी बेळगाव असे धरणात बुडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत बालक हा आपल्या पाहुण्यांच्या घरी रहायला आला होता धरणाकडे तो फिरायला गेला असता पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

शनिवारी दुपारी तो पाहुण्यांसोबत तलाव पाहायला गेला होता तलावाच्या काठावर मातीच्या ढिगाऱ्यावर थांबून पहाणी करत असताना अचानक पायाखालची माती ढासळली आणि घसरून तो तलावात पाण्यात पडला.

 belgaum

तलावात पाणी अधिक असल्याने पाण्यात तो खोलवर बुडाला त्याच्या नातेवाईकानी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र काही वेळात त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची खादरवाडी गावात माहिती समजली असता बघ्यांनी गर्दी केली होती ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अग्निशामक दलाच्या जवानांना देखील पाचारण करण्यात आले होते मात्र पाणबुडी च्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.मयत मुलाचे डिप्लोमा शिक्षण पूर्ण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.