belgaum

बेळगाव शहरातील १०० हून अधिक लॉजेसवर पोलिसांनी सर्च मोहीम राबवली होती त्यामुळे लॉज मालकांचे धाबे दणाणले होते.

शनिवारी रात्री बेळगाव पोलिसांनी शहर परिसरातील 100 हून अधिक लॉजेस वर जाऊन अचानक पणे झाडाझडती चे काम सुरू केले. बेळगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे लॉज चालकांचे एकच धाबे दणाणले होते.Police search

bg

पोलिस प्रशासनाच्या निर्णयानुसार लॉज मालक नियमानुसार गग्राहकाची नोंद करून घेतात की नाही ? ग्राहकांकडून आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता केली जाते की नाही ?

लॉजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत का ? लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय चालत आहेत का ? यासंदर्भात सर्च मोहिमेत पोलीस पथकांनी माहिती घेतली.

दरम्यान अचानक पणे सुरु झालेल्या पोलिसांच्या ऑपरेशन सर्च मुळे बेळगावच्या लॉज मालकांना मध्ये एकच खळबळ उडाली आहे.बेळगावात आगामी महिन्यात होणारे कर्नाटक विधी मंडळाचे अधिवेशन आणि इतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोहीम राबवली असल्याचे बोलले जात आहे.

 classic belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.