Saturday, April 20, 2024

/

पाच दिवसाच्या गणेश उत्सवाचे काय आहेत ते नियम

 belgaum

कर्नाटक सरकारने गणेशोत्सव 5 दिवस साजरा करण्यास मान्यता दिली. तसेच अनेक नियम घालून दिले आहेत . सर्व उत्सव मंडळांना या नियमांचे पालन करण्याचे बंधन असणार आहे. गणेशोत्सव मंडळांना अर्थात गणेशोत्सवाच्या आयोजकांना नियम न पाळल्यास कारवाईचा फटका बसणार आहे .

कर्नाटक सरकारने घालून दिलेल्या निर्देशानुसार अनेक नियम पाळावे लागणार आहेत .असे स्वतः महसूल मंत्री आर अशोक यांनी स्पष्ट केले आहे.पाहुयात काय आहेत ते नियम.

1.शहरी भागातील प्रत्येक वॉर्डात एकच ठिकाणी उत्सव साजरा करता येणार
2.शहरी भागात एक वॉर्ड एक गणेश पेंडॉल ची काटेकोर कारवाई होणार
3.ग्रामीण भागात प्रत्येक गावात एक पेंडल. अर्थात एक गाव एक गणपती.

4.गणेशोत्सव शाळा आणि महाविद्यालयांमध्ये किंवा आवारात आयोजित करता येणार नाही. 5.उत्सव काळात मनोरंजनाचे कार्यक्रम करता येणार नाहीत.

6. 50 फुटांपेक्षा जास्त मोठा मंडप उभारण्याची परवानगी नाही.
7.रात्री 9 नंतर पूजा किंवा आरती करता येणार नाही
8.सर्व आयोजकांनी लसीकरण करून घेतलेले आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.