belgaum

खानापूर येथील शिवशंकर कट्टीमणी हे प्रसिद्ध व्यवसायिक म्हणजे एक बहुगुणी व्यक्तिमत्त्व असून पर्यावरण पूरक श्री मूर्ती बनविणाऱ्या शिवण्णा यांना सुप्रसिद्ध मूर्तिकार कै. बाबुराव चित्रगार यांनी मूर्ती कलेतील खानापूरचा ‘एकलव्य’ म्हणून गौरविले आहे. याखेरीज शिवशंकर यांना निरनिराळी 9 वाद्यं वाजविता येतात हे विशेष होय.

bg

खानापुरातील कट्टीमणी इंटरप्राईजेसचे मालक असणारे शिवशंकर कट्टीमणी यांच्याकडे पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती तयार करण्याची जादुई कला आहे. वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षापासून त्यांचे शाडू मातीशी नाळ जुळली आणि कालांतराने सुप्रसिद्ध मूर्तिकार बाबुराव चित्रकार यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांना गुरु मानून शिवण्णा अर्थात शिवशंकर यांनी स्वतःच्या स्वतः मुर्तीकला आत्मसात केली. महाभारतातील एकलव्याप्रमाणे गुरुविना गुरुची विद्या आत्मसात करणाऱ्या शिवण्णा यांचे वडील पोलिस खात्यात असल्यामुळे करड्या शिस्तीचे होते. त्यामुळे लहानपणी शाडूच्या मातीत खेळणाऱ्या शिवण्णाला वडिलांचा मारही खावा लागला. तथापि लहानग्या शिवण्णाने जेंव्हा शाडूपासून एक सुबक सुंदर गणेश मूर्ती बनविली, त्यावेळी हे चित्र पालटले. शिवण्णाने बनविलेली मूर्ती पाहून त्यांचे वडील थक्क झाले. आपल्या मुलाची श्रीगणेशा वरील भक्ती -प्रेम आणि त्याच्या हातात असलेली असामान्य मूर्तिकला जाणून त्यांनी शिवण्णा यांना कोणतीही आडकाठी न करता त्यांच्या मूर्ती कलेस प्रोत्साहन दिले.

लहान वयाच्या शिवण्णाने एक दिवस आपण तयार केलेल्या गणेश मूर्तीची अचानक घरात प्रतिष्ठापना केली आणि आपले जिवलग मित्र विनायक कोडोली, प्रभू होसमनी व शशिकांत पवार यांच्या मदतीने त्या मूर्तीची पूजा सुरू केली. मुलाच्या या कृतीमुळे घरची मंडळी चिंतेत पडली. कारण कट्टीमणी घराण्यात श्री गणेश प्रतिष्ठापनेची परंपरा नव्हती. चिंतीत कुटुंबीयांनी यासंदर्भात गावातील वयोवृद्ध जाणकार काळाम्मा आज्जी या शतायुषी महिलेचा सल्ला घेतला. तेंव्हा वयाची 101 वर्षे पूर्ण केलेल्या काळाम्मा आज्जीने चिंतेचे कारण नसल्याचे सांगून शिवण्णाने त्याच्या हयातीपर्यंत स्वतः बनवलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तीची दरवर्षी प्रतिष्ठापना करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. 1986 सालच्या या घटनेनंतर आजतागायत गेली 36 वर्षे शिवण्णा आणि त्यांचे मित्र आपल्या कुटुंबियांसमवेत सदर परंपरा जपत आहेत.Kattimani

प्रारंभी कांही वर्षानंतर सुप्रसिद्ध मूर्तिकार बाबुराव चित्रकार यांना शिवशंकर कट्टीमनी यांच्या उत्कंठा मूर्ती कलेची माहिती मिळाली. तेंव्हा त्यांनी तात्काळ शिवण्णा यांची भेट घेतली. तसेच ओळख नसतानाही आपल्याला गुरु म्हणून स्वतःहून मूर्तीकला आत्मसात केल्याबद्दल चित्रकार यांनी शिवण्णा यांना ‘खानापूरचा एकलव्य’ अशी उपाधी देऊन सन्मानित केले.

मूर्तीकले व्यतिरिक्त खानापूर बसस्थानकासमोरील मांगरीश कॉम्प्लेक्समध्ये शिवशंकर कट्टीमणी यांचे कट्टीमणी एंटरप्राइजेस हे दुकान आहे. शिवशंकर हे विभिन्न 9 वाद्ये वाजविण्यात पारंगत आहेत. घरामध्ये त्यांचा स्वतःचा सुंदर आर्ट स्टुडिओ आहे. दरवर्षी श्री गणेश चतुर्थी दिवशी ते भजन आणि भक्ती गीताचे कार्यक्रम आयोजित करत असतात. निसर्गप्रेमी अत्यंत मृदू स्वभावाच्या सहृदयी शिवशंकर कट्टीमणी यांच्यावर श्री गणेशाचा कृपाशिर्वाद कायम राहो, अशी सदिच्छा त्यांच्या मित्रमंडळींनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त व्यक्त केली आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.