राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साजरीकरणाबद्दल 5 सप्टेंबर रोजी एक बैठक होणार आहे. त्यावेळी ठोस निर्णय घेण्यात येईल अशी माहिती कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
ते म्हणाले की ,बैठकीत सध्याच्या कोरोना परिस्थितीवर चर्चा होईल आणि तज्ञांच्या मदतीने योग्य निर्णय घेतला जाईल.
अनेक संस्था सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आधीच जोर लावत आहेत. म्हणून आम्ही राज्यातील जिल्ह्यांमधील कोरोना विषयक तज्ञांचे अहवाल ऐकले आहेत. 5 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा निर्णय घेतला जाईल, त्यापूर्वी तज्ञांचा अहवाल आणि सल्ला मागविण्यात आला असून त्यावर योग्य अभ्यास करून निर्णय घेतला जाणार आहे.
पोलिसांनी देशविरोधी कार्यकर्त्यांचा माग काढला आहे.पोलीस खात्याने देशाच्या विरोधात असलेल्यांचा माग काढला आहे. जे अतिरेकी आणि स्लीपर सेल्सशी हातमिळवणी करतात त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.
एनआयएने आधीच काहींवर बंदी घातली असून अटकही केले आहे. आमचे पोलीस एनआयएसोबत काम करत आहेत.”