Saturday, April 27, 2024

/

घरगुती गॅस पुन्हा 25 रुपयांनी महागला

 belgaum

17 ऑगस्ट रोजी एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढवणाऱ्या भाजपच्या नेतृत्वा खालील एनडीए सरकारने 1 सप्टेंबरपासून पुन्हा दरात 25 रुपयांची वाढ केली आहे.

कर्नाटकात 14.2 किलो घरगुती विना-सबसिडी सिलेंडरची किंमत जी मंगळवारी 862 रुपये होती ती आता आज बुधवारपासून 887 रुपये झाली आहे. 15 दिवसांत दरात 50 रुपयांनी वाढ झाली.

कर्नाटकातील घरगुती सिलेंडरची किंमत 1 जानेवारीपासून 17 ऑगस्टपर्यंत 190 रुपयांनी वाढली होती.तर आता आणखी 25 रुपये म्हणजे 215 रुपयांनी वाढली आहे.

 belgaum

घरगुती स्वरूपात स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरची किंमत आता आणखी पंचवीस रुपयांनी वाढली आहे. आता नव्याने सिलेंडर भरून घेण्यासाठी कर्नाटकात 887 रुपये मोजावे लागणार आहेत.
मागील तीन महिन्यात तीसऱ्यांदा ही वाढ झाली असून 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडर च्या दरात 10 महिन्यात झालेली वाढ त्रासदायक आहे.
2014 मध्ये गॅस सिलेंडरची किंमत मोदी सरकार येण्यापूर्वी चारशे दहा रुपये होती. गेल्या सात वर्षात दुपटीने वाढ झाली असून काँग्रेसने या वाढीला विरोध दर्शवून आता पुन्हा एकदा जनावरांच्या शेणा पासून बनवलेल्या शेणीचा वापर करून स्वयंपाक करण्याची वेळ या सरकारने आणून दिल्याची टीका केली आहे.
लोकांना थोडा तरी दिलासा द्या लोकांच्या खिशाचा विचार करा आणि कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून तरी दर वाढवा. अशी टीका काँग्रेसने केली आहे .
भारतातील सर्व कुटुंबे स्वयंपाकासाठी चुली ऐवजी आता गॅस वर अवलंबून आहेत. जास्तीत जास्त घरांमध्ये घरगुती गॅसचा वापर केला जातो. तर घरगुती गॅसच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडणारी आहे. श्रीमंत वर्गालाही गॅस दर परवडू नये इतकी वाढ झाल्याने सध्या नागरिक चिंतेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.