belgaum

बेळगाव बंगळुरू एक्सप्रेस रेल्वेला दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नामकरण करा असा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

बेळगाव येथील अंगडी कॉलेज मध्ये कै सुरेश अंगडी यांच्या प्रथम स्मृतीदिनी अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर ते बोलत होते.बेळगाव धारवाड नवीन रेल्वेमार्ग पूर्णत्वास राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल हा रेल्वे मार्ग पूर्ण करणे हे अंगडी यांचे स्वप्न होते ते पूर्ण होईल असा विश्वास बोम्मई यांनी व्यक्त केला.

bg

सुरेश अंगडी हे राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते त्यांनी रेल्वे मंत्री म्हणून केवळ कर्नाटक नव्हे तर महाराष्ट्र राजस्थान अश्या राज्यात देखील भरीव कार्य केले आहे.बंगळुरू शहर रेल्वे, तुमकर बंगळुरू रेल्वे आणि बेळगाव धारवाड रेल्वेला मंजुरी मिळवून दिली होती त्यांच्या स्वप्नातल्या योजना राज्य सरकार पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे बोम्मई म्हणाले.Bommai angdi statue

यावेळी माजी मंत्री जगदीश शेट्टर,मंत्री उमेश कत्ती,माजी खासदार प्रभाकर कोरे, प्रकाश हुक्केरी,माजी मंत्री लक्ष्मण सवदी, महंतेश कवठगिमठ आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री बोंम्मई आणि प्रदेश भाजप अध्यक्ष नलिन कटील यांनी महावीर भवन येथे भाजपच्या नूतन 35 नगरसेवकांचा सत्कार केला यावेळी मनपा निवडणुकीत 35 नगरसेवक निवडून आणण्यात योगदान दिलेल्या आमदार आणि पालकमंत्री यांचे तोंडभरून कौतुक केलं.याशिवाय टिळकवाडी येथे खास करून मतीमंद मुलांच्या करीत बनवण्यात आलेल्या उद्यानाचे अनावरण केलं.

 classic belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.