Friday, March 29, 2024

/

मनपातील डोळस कर्मचाऱ्यांना मिळणार ‘या’ अंधाची मदत

 belgaum

बेळगाव शहरातील माहेश्वरी अंध शाळेचा माजी विद्यार्थी असणारा सुमित मनोहर मोतेकर या अंध युवकाची राज्य लोकसेवा आयोगाकडून बेळगाव महापालिकेत द्वितीय दर्जा सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पद्धतीने महापालिकेतील डोळस कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच एका अंध कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली आहे.

सुमित मोतेकर हा मूळचा गोकाकचा असून सध्या तो आरोग्य विभागात सेवा बजावत आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून महापालिकेत द्वितीय दर्जा साहाय्यक म्हणून नियुक्त झालेला सुमित माहेश्वरी अंध शाळेचा माजी विद्यार्थी आहे.

गेल्या 2014 साली त्याने या शाळेतून दहावीचे शिक्षण पूर्ण केले आहे. माहेश्वरी अंधशाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विकास कलघटगी यांनी सोमवारी सुमितची भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी माहेश्वरी शाळेतील अनुभव आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरल्याचे सुमितने सांगितले. महापालिकेत रुजू होण्याआधी सुमितने हैदराबाद येथे एका खाजगी कंपनी सेवा बजावली आहे.

 belgaum

अंध असला तरी सुमित मोतेकर संगणक हाताळून उत्तम टायपिंग करू शकतो. डोळस कर्मचार्‍याने बाजूला बसून सांगितले तर सुमित टाईप करू शकतो. सध्या सुमितकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही आयुक्त डॉ रुद्रेश घाळी यांच्याशी चर्चा करून कोणती जबाबदारी द्यावी याचा निर्णय घेतला जाणार आहे.Blind employee ccb

सुमित अंध असल्यामुळे तो महापालिकेचे कामकाज कसे करणार? असा प्रश्न होता. त्याला कामकाज करणे सोपे व्हावे यासाठी ब्रेल लिपी असलेला संगणक कीपॅड देण्यात यावा, अशी शिफारस आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य अधिकारी डॉ संजय डुमगोळ यांच्याकडे केली आहे.

तथापि सुमितने मात्र तशी मागणी केलेली नाही. नेहमीच्या कीपॅडच्या सहाय्याने त्याने काम सुरू केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तो सुखद धक्का ठरला आहे. सध्या तुर्तास सुमितकडे आरोग्य विभागात आलेल्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.