Friday, April 26, 2024

/

पाठ्य पुस्तकातील अवमानकारक लिखाण हटवा

 belgaum

खानापूर युवा समितीचे बीईओना निवेदन;आंदोलनाचा इशारा
इयत्ता नववीच्या पाठ्य पुस्तकात छ. संभाजी महाराज व छ. शाहू महाराज (दुसरे) यांच्याबाबतअवमानकारक व आक्षेपार्ह असलेले लिखाण हटवून पुस्तकांची नव्याने छपाई करावी,अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. क्षेत्र शिक्षणाधिकारी (बीईओ) लक्ष्मण यकुंडी यांना यासंदर्भातील निवेदन सादर केले.

नववीच्या कन्नड आणि इंग्रजी माध्यमातील समाज-विज्ञान पुस्तकात मोगल आणि मराठा या धड्यात आक्षेपार्ह लिखाण आहे. छ. शिवाजी महाराजांनंतर छ. संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा मोठा विस्तार केला.

त्यानंतर छ. शाहू महाराज(दुसरे) यांनी उत्तम प्रशासन देत नावलौकिक मिळविला. असे असताना पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने जाणीवपूर्वक मराठा साम्राज्यातील महापुरुषांची बदनामी केली आली आहे. त्याकरिता त्वरित त्याची दुरुस्ती करून छपाई करण्यात यावी, अन्यथा युवा समिती कडून तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल.Mes memo

 belgaum

असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.बीईओ लक्ष्मण यकुंडी यांनी निवेदनाच स्वीकार करून वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, कार्यकारिणी सदस्य राजाराम पाटील, मारुती गुरव, रामचंद्र गावकर, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, सचिन साळुंखे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.