Friday, May 3, 2024

/

सीईटी परीक्षेला उद्या प्रारंभ : ज्यादा बसेसची सोय

 belgaum

कर्नाटक परीक्षा प्राधिकारतर्फे उद्या शनिवार दि. 28 आणि रविवार दि. 29 ऑगस्ट रोजी सामान्य प्रवेश परीक्षेचे (सीईटी) आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने जादा बस गाड्यांची सोय केली आहे.

सामान्य प्रवेश परीक्षेची बहुतांश केंद्रे तालुक्यासह ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे या परीक्षा केंद्रांपर्यंत वेळेत पोहोचणे परीक्षार्थींना सुलभ जावे यासाठी वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या व्याप्तीतील हुबळी, धारवाड, हावेरी, गदग, कारवार, बागलकोट, बेळगाव आणि चिक्कोडी परिवहन विभागाच्या सर्व शाखांमधून सीईटी परीक्षेस जाणाऱ्या परीक्षार्थींसाठी बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. तरी संबंधित सर्व परीक्षार्थीनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या मुख्य नियंत्रण व्यवस्थापकांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.