Sunday, January 5, 2025

/

निर्बंधांमध्ये आणखी शिथिल : नाईट कर्फ्यू रात्री 10 ते 5

 belgaum

कर्नाटक सरकारने नवी अनलॉक मार्गदर्शक सूची जाहीर केली असून उद्या सोमवार दि. 19 जुलै 2021 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ती अंमलात आणली जाणार आहे.

कर्नाटक सरकारने आज रविवारी लाॅक डाऊनच्या निर्बंधात आणखी शिथिलता जाहीर केली आहे. आता राज्यातील रात्रीच्या कर्फ्यूचा कालावधी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असा कमी करण्यात आला आहे. सिनेमागृहं, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं, रंगमंदिरं, सभागृहं आदी जागा आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी असणार आहे. तथापि हे करताना कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन केले गेले पाहिजे.

राज्यातील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर महाविद्यालय येत्या सोमवार दि. 26 जुलैपासून पुनश्च प्रारंभ होतील. मात्र फक्त कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान पहिला डोस घेतलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीच ती खुली असतील.

Mask corona
Mask

कोरोना नियमांचे पालन करून सर्व कौशल्य विकास प्रशिक्षणसह दीर्घकालीन तांत्रिक अभ्यासक्रम सुरु करण्यास देखील परवानगी असणार आहे.

तथापि येथील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान पहिला डोस घेतलेला असला पाहिजे. राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याच्या कार्यकारी समितीचे चेअरमन पी. रविकुमार यांच्या स्वाक्षरीने उपरोक्त मार्गदर्शक सूचीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.