Saturday, May 4, 2024

/

रेबीज प्रतिबंधक मोफत लसीकरणाबाबत आवाहन

 belgaum

बेळगाव शहरातील बेळगाव पशु कल्याण संघटनेतर्फे (बावा) हॅप्पी फीट वेल्फेअर संघटनेच्या सहकार्याने येत्या बुधवार दि. 21 जुलै 2021 रोजी शहरातील चार विविध ठिकाणी कुत्र्या मांजरांसाठी रेबीज प्रतिबंधक मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

बावा आणि हॅप्पी फिट वेल्फेअर संघटनेतर्फे 21 रोजी शहरातील पुढील चार ठिकाणी रेबीज प्रतिबंधक मोफत लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. 1) रॉयल पेट वर्ल्ड, कावळे होस्टेल आश्रय एम्पायर, खानापूर रोड, टिळकवाडी.

संपर्क : 8073351548, वेळ -सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत. 2) सराफ इनक्लेव्ह, प्लॉट नंबर 1 सीएसटी 32 ए, बॉक्साइट रोड अझमनगर. संपर्क : 9482693661, वेळ -सायं. 5 ते 7 वाजेपर्यंत. 3) स्वागत हॉटेल, धारवाड रोड फॉर्ड शोरूम, शहापूर. संपर्क : 7676866399, वेळ -सायं. 5 ते 7 वाजेपर्यंत. 4) हेल्थ अँड फिटनेस, काँग्रेस रोड टिळकवाडी, पहिला रेल्वे गेटजवळ. संपर्क : 9964759003 वेळ -सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत.Bawa

 belgaum

बेळगाव शहरात पहिल्यांदाच अशाप्रकारे कुत्र्या मांजरांसाठी रेबीज प्रतिबंधक मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पुरस्कर्ते म्हणून रॉयल पेट वर्ल्ड टिळकवाडी, मन्न इव्हेंट्स बेंगलोर, एस्क्वायर रेडीमेड खडेबाजार बेळगाव,

कलाकार अनगोळ मेन रोड आणि विजय बेकर्स टिळकवाडी हे पुरस्कर्ते म्हणून लाभले आहेत. तरी नागरिकांनी आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांसाठी या मोफत लसीकरण मोहिमेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बावा संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.