Sunday, April 28, 2024

/

वडगावात जुगारी अड्ड्यावर धाड-चार जण अटकेत

 belgaum

चावडी मंदिर वडगाव राजवाडा कंपाउंड खुल्या जागेत जुगार खेळत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून चार जुगाऱ्याना अटक करत वीस हजार रुपये रोख रक्कम जप्त केली.

बुधवारी रात्री शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.राजु रामचंद्र ढगेन्नावर (वय49) रा. भुनेश्वर गल्ली दुसरा क्रॉस लक्ष्मी नगर,निळकंठ मारुती कार्सिद्धांन्नावार (वय 28) रा. बुढरकट्टी (ता बैलहोंगल), दत्ता वसंत देवकरमणी (वय 35) रा. मलप्रभा नगर वडगाव, गंगाधर विठ्ठल बुचाडी (वय 46) रा. पाटील गल्ली वडगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

चारही आरोपी खुल्या जागेत राजवाडा कंपाऊंड येथे जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी शहापूर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मंजूनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन धाड घातली यामध्ये चौघांना ताब्यात घेऊन शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.