मुलां मधील कोरोना रोखण्यासाठी बिम्स वैधकीय कर्मचाऱ्यांना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोनाच्या तिसरी लाट थोपण्यासाठी बिम्स प्रशासनाकडून पाऊल उचलली जात आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना बेळगाव येथील बिम्स मध्ये पूर्व तयारी सुरू झाली आहे.शुक्रवारी बिम्स डॉक्टरांना शिबिराचे आयोजन कऱण्यात आले आहे.
बिम्सचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी बिश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या शिबराची सुरुवात करण्यात आली.सहा बॅच मध्ये प्रत्येक वेळी 50 जणांना बिम्स कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
लहान मुलांत आढळणारी कोरोनाची लक्षण,तपासणी करायची पद्धत, लहान मुलांना कोविड झाल्यास अवलंबण्यात येणारी उपचार पद्धती,नवजात शिशू कोरोना झाल्यास कोणती काळजी घ्यावी,लहान मुलांना ऑक्सिजन कसे द्यावे आणि इस्पितळाने कसे नियम पाळावेत याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
1 जुलै ते 6 जुलै पर्यन्त हे शिबिर चालणार असून बिम्स वगळता जिल्ह्यातील इतर शासकिय डॉक्टरांना देखील याचा सहभागी करून घेतले जाणार आहे.डॉ उमेश कुलकर्णी, डॉ एस एस बळळारी ,डॉ सुधाकर आर सी, डॉ गिरीश दंडगी आदींनी यात सहभाग घेतला होता