चार महिन्यापूर्वी प्रेम विवाह केलेल्या पती-पत्नीच्या झालेल्या भांडणात विवाहित युवतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री आळवन गल्ली शहापूर येथे येते घडली.
ज्योती कुमार यललारी (वय 19) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. शहापूर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.
मुचंडी येथील कुमार यललारी वय 23 याचा बसवण गल्ली शहापूर येथील ज्योती हिच्याशी झाला होता ते दोघेही आळवन गल्ली येथील चाळीत भाड्याच्या घरात रहात होते लग्नाच्या नंतर दोघात भांडणे होत होती.यापूर्वीही या युवतीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती उघडकीस आली आहे.
मुलीच्या घरच्या लोकांनी हा संशयास्पद मृत्यू झाला असल्याचे पोलीसाना सांगितले आहे.दरम्यान आत्महत्या आहे की आणखी काय हे पोलीस तपासा नंतर स्पष्ट होणार आहे.शहापूर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.