बेळगाव शहरात होणाऱ्या केपीएससी ग्राफ ए, बी परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
बेळगाव शहरात येत्या 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट 2021 रोजी कर्नाटक लोकसेवा आयोगाची (केपीएससी) ग्राफ ए तांत्रिक आणि ग्राफ बी तांत्रिक /तांत्रिकेतर पदासाठी स्पर्धात्मक परीक्षा आणि सक्तीची कन्नड भाषा परीक्षा घेतली जाणार आहे.
याखेरीज शहर आणि ग्रामीण योजना खात्यातील सहाय्यक संचालक पदासाठी 7 ऑगस्टपासून स्पर्धात्मक परीक्षा होणार आहे. यासंदर्भात आज बुधवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत शहरातील चार परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. बैठकीत कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून परीक्षा कशी सुरळीत पार पाडता येईल या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक, पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे आदींसह संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते.