बेळगाव इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स(बीम्स)च्या संचालक पदी आय ए एस दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी बेळगाव विमान तळावर केली.
बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा आढावाघेण्यासाठी मुख्यमंत्री बेळगाव दौऱ्यावर आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिश्वास हे बेळगाव जिल्हा रुग्णालय अर्थात बीम्सच्या प्रशासक पदी नियुक्त करण्यात आली आहे
आणि नियंत्रण करण्या बाबत बीम्सबाबतकरण्यात आली आहे अनेक तक्रारी आल्या आहेत त्यामुळे बीम्स संचालक डॉ विनय धास्तीकोप्प यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते या शिवाय सात कर्मचाऱ्याना नोटीस देखील बजावण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या अनुसार बीम्स मध्ये अगदी दुर्व्यवस्था झाली आहे जाड कातडीच्या बीम्स कर्मचाऱ्या बद्दल बोलायला शब्द नाहीत असा संताप व्यक्त केला.
आगामी तीन दिवसात बीम्स संचालक पदी आय ए एस अधिकारी बिश्वास कार्यभार घेऊ शकतात