सोमवार पासून कडक लॉक डाऊनला प्रारंभ होणार असून या कालावधीत वाहने घेवून सामान आणायला जाण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.
जनतेने आपल्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्या भागातील दुकानातच चालत जावे.सगळ्या तऱ्हेची प्रवासी वाहतूक बंद असणार आहे.केवळ विमानतळावरून,रेल्वे स्टेशनवरून येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे तिकीट दाखवून खासगी टॅक्सी आणि अन्य वाहनांचा वापर करता येईल.
लस घेण्यासाठी जायचे असेल तरी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चालत जावे लागणार आहे.हॉटेल मधून पार्सल पोचवणाऱ्या व्यक्तींना वाहन वापरण्यास अनुमती देण्यात आली आहे.वाहने घेवून फिरणाऱ्या व्यक्तीवर पोलीस कारवाई करणार आहेत.
पोलीस सोमवार पासून सुरू होणाऱ्या लॉक डाऊन ची अमलबजावणी कडकपणे करणार असल्याची चुणूक शनिवारी पाहायला मिळाली.शनिवारी पोलिसांनी अनेक ठिकाणी फिरणाऱ्या वाहन चालकांना थांबवून त्यांच्यावर कारवाई केली आहे.