Tuesday, April 23, 2024

/

कोरोना काळात रुग्णांच्या नाते वाईकांची हेळसांड थांबवा

 belgaum

कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशभरात कोरोणा रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे.त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. तर कधी ऑक्सिजन मिळत नाही. कुठे मृत्यूनंतर स्मशानात लाकूड उपलब्ध होत नाही.

रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडच्या अभावामुळे देशात आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत काही लोक याचा फायदा घेत आहेत.काही किलोमीटर प्रवासासाठी रुग्णवाहिका हजारो रुपये घेत आहे. तर रेमडीसेवीयर इंजेक्‍शनचा काळा बाजार सुरू आहे. बेळगाव जिल्हा रुग्णालयातून मृतदेह वाहून नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका कडून रुग्णाच्या नातेवाईकांची लूट होत आहे.काही सेकंदच्या अंतरावर असणारे सदाशिवनगर च्या स्मशानभूमीत शेव नेण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपयांची मागणी केली जात आहे.

मरण पावल्यानंतरही रुग्णाच्या नातेवाईकांची फरफट थांबत नाही. त्याचा बेळगाव मध्ये दाहक अनुभव येत आहे. दुखात असणाऱ्या नातेवाईकांना *मृताच्या टाळूवरचे लोणी* खाण्याचा प्रकार दिसून येत आहे. या लुटारू वर कोण लगाम घालणार असा प्रश्न विचारला जात आहे.

 belgaum

Ramakant k
कोरणा संसर्गामुळे रुग्णाची संख्या वाढली आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी ऑक्सीजन खाट मिळणे कठीण झाले आहे.खासगी रुग्णालयातील खर्च न परवडणारा असल्यामुळे गरिबांना जिल्हा रुग्णालयातच उपचारासाठी जावे लागत आहे. पण तेथे ऑक्सिजन खाट मिळत नसल्यामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे ऑक्सीजन पुरवठ्यात होणाऱ्या व्यत्ययामुळे कोरोणा बाधित रुग्णांच्या मृत्यू ची संख्या वाढत आहे.

अनेकांच्या घरातील कर्त्या पुरुषांचा यात बळी जात आहे. हतबल झालेल्या नातेवाईकांच्या अनिवार्यतेचा आणि कोरोना ने मृत्यू झालेल्या शवा पुढे भीतीपोटी कोणच येताना दिसत नाही. या हतबलतेचा फायदा घेत रुग्णवाहिका चालकांनी लूट सुरू केली आहे. कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. रुग्णवाहिका चालक यांनी माणुसकी पेक्षा पैशाला महत्व दिले आहे. यावर पायबंद घालण्याची मागणी श्री राम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केली आहे.

त्याच बरोबर त्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी श्रीराम सेना हिंदुस्तान च्या कार्यकर्त्यांची संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले आहे.तसेच रुग्णाच्या मरणाची वाट पाहत असणाऱ्या रुग्णवाहिका ठेकेदारांना समज देण्याची मागणी केली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तान च्या कार्यकर्त्यांचा संपर्क खालील प्रमाणे.
Trushal 9113261088
Sachin C 9606885088
Sachin P 9343426037
Shrikant 8618691198
Umesh K 9740018375
Balavant S 9742421343
Manjunath. 8317307041
Shankar P 9620829888
Praveen D 9036416142
Mahesh J. 9964224566
Rajendra B. 9036505490
Babu N 8050414866
Sandeep K 9470199678.
बेड न मिळणे , तो मिळाला तर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध न होणे. बेड मिळताच रुग्णवाहिका चालकांकडून अवास्तव भाडे आकारले जाणे.त्यानंतर रुग्णालयात रेमडीसेविर अभावि ते काळाबाजारतून घ्यावे लागणे याचा सामना सध्या कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.