लॉक डाऊन काळात लग्न समारंभाचे काय हा प्रश्न सध्या निर्माण झालाय.
याबद्दल प्रशासनाने उत्तर दिले आहे. आधी ठरलेली अर्थात पूर्वनियोजित विवाह होऊ शकतात पण त्यासाठी काही नियम पाळावे लागणार आहेत.
कर्नाटक सरकारने जारी केलेल्या सुधारित नियमावली नुसार विवाह समारंभांसाठी स्वतंत्र नियम बनविण्यात आला आहे. घरच्या घरी आणि अतिशय जवळच्या 40 नातेवाईकांना घेऊन विवाह करता येणार आहेत. लग्न मंडप किंवा कार्यलयात जाणे, गर्दी करणे, मोठ्या जेवणावळी याला मात्र बंदी घालण्यात आली आहे.
लग्नापूर्वी एक पत्र मनपा आयुक्त किंवा तहसीलदार यांना देऊन रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही परवानगी देताना प्रशासन 40 पास देणार आहे.
पास असलेल्या व्यक्तींनाच विवाह समारंभास उपस्थित राहता येईल.