राज्यातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे विकेंड कर्फ्यू जाहीर करण्यात आला. पुढील काळातही हा कर्फ्यू असाच सुरू राहणार की नाही, यासंदर्भात कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्टीकरण दिले असून हा कर्फ्यू पुढील काळात कायम करण्याबाबत अद्याप सरकारकडे कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले.
यासंदर्भात बेंगळुर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शनिवारी विकेंड कर्फ्यू कायम ठेवावा की नाही, याबाबतीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
सध्या जाहीर केलेला विकेंड कर्फ्यू यशस्वी झाला असून याव्यतिरिक्त कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही, असे ते म्हणाले.
1 मे पासून 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांना पहिल्या टप्प्यातील लस देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील लस देणे बाकी आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यातील को-व्हॅक्सीन, कोव्हीडशिल्ड या लसींचा तुटवडा आहे, ही बाब माझ्या निदर्शनास आली आहे.
याऐवजी आता रेमडिसवर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात होत असलेला लसींचा तुटवडा आणि ऑक्सिजन पुरवठा पुढील काळात योग्य वेळेत पुरविला जाईल, असा विश्वास देखील गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला.