Saturday, April 27, 2024

/

चव्हाट गल्लीच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू

 belgaum

एपीएमसी मार्केटयार्ड प्रवेशद्वारानजीक अत्यवस्थ आढळून आलेल्या चव्हाट गल्ली येथील तरुणाचा काल रात्री मृत्यू झाला असून या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

राजेश्वर राजू पाटील (वय 24, रा. चव्हाट गल्ली) असे मयत युवकाचे नांव आहे. त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एपीएमसी पोलीस स्थानकात सीआरपीसी कलम 174 सी अन्वये प्रकरणाची नोंद झाली आहे.

पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पुढील तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राजेश्वर याला दारूचे व्यसन होते. तो बुधवारी कंग्राळी खुर्द परिसरात गेला होता. त्या ठिकाणी अज्ञातांनी जबर मारहाण केल्यानंतर रात्री 8:45 च्या सुमारास तो अत्यवस्थ अवस्थेत एपीएमसी मार्केट यार्ड प्रवेशद्वारासमोर पडला होता.

 belgaum

तेंव्हा आसपासच्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचाराचा फायदा न होता काल गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.