Sunday, April 28, 2024

/

बेळगाव तालुका पंचायतीतील मतदार संघ आणि मतदार संघातील समाविष्ट गावे

 belgaum

बेळगाव तालुक्यातील १२ जिल्हा पंचायत मतदारसंघांत फेरबदल करण्यात आले आहेत. तर जिल्हा पंचायतीची सदस्यसंख्या ९० वरून १०१ वर पोचली आहे. बेळगाव तालुक्यात जिल्हा पंचायतीचे १२ मतदारसंघ कायम राहिले असून काही मतदारसंघांत फेरफार करण्यात आले आहेत. बेळगाव जिल्हा व तालुका पंचायतीचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात येत असून लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी संपताच जिल्हा व तालुका पंचायतीच्या रणधुमाळीला सुरवात होणार आहे.

कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या मतदारसंघांची पुनर्रचना केली आहे. निवडणूक आयोगाने तालुका पंचायत मतदारसंघांची पुनर्रचना करताना भौगोलिक सलगतेचे कारण पुढे करीत मराठीबहुल भागांना कानडी भाग जोडले आहेत. मतदारसंघांची तोडफोड करून सदस्य संख्याही ४५ वरुन ३४ इतकी कमी केली आहे. मराठी भाषिकांना तालुका पंचायतीवर सत्ता मिळू नये याची व्यवस्था करण्यात आल्याचे यावरुन स्पष्ट होते.

बेळगाव तालुका पंचायत मतदारसंघ मतदार संघ समाविष्ट गावे
नवी वंटमुरी – हालभावी, नवी वंटमुरी, बोम्मनहट्टी, उक्कड, मल्लहोळी, परश्यानट्टी, सुतगट्टी, मरणहोळ, रामदुर्ग, भुतरामट्टी
हुदली – हुदली, रामापूर, कुमरी, हारनकोळ्ळ, धरनट्टी, पडीहोळी, पणगुत्ती
केदनूर – केदनूर, मण्णीकेरी, बंबरगे, गुब्रेनट्टी, होसूर, कट्टणभावी, गुरामट्टी, निगेनट्टी, इद्दलहोंड, गुडीहाळ
अगसगा – अगसगा, चलवेनट्टी, म्हाळेनट्टी, हंदिगनूर, कुरिहाळ खुर्द, कुरिहाळ बुद्रूक, बोडकेनट्टी
होनगा – होनगा, दासरवाडी, बेन्नाळी, हेगेरी, विरनभावी, जुने होसूर, जुमनाळ, नवे होसूर
काकती – काकती, सोनट्टी
कडोली – कडोली, जाफरवाडी, देवगिरी (गुंजेनट्टी)
कंग्राळी बुद्रुक – कंग्राळी बुद्रूक, गौंडवाड, जुने गौंडवाड मुचंडी मुचंडी, कलखांब, हुल्यानूर
आष्टे – आष्टे, बुड्यानूर, चंदगड, खणगाव खुर्द, तुम्मरगुद्दी, सोमनट्टी, भीमगढ, करीकट्टी, सिद्दनहळ्ळी, केंपदीनी, कबलापूर, मास्तीहोळी, भरम्यानट्टी, करवीनकुंपी, कारावी
सुळेभावी – सुळेभावी, यद्दलभावीहट्टी, खणगाव खुर्द, चंदूर
मारिहाळ – मारीहाळ, करडीगुद्दी, मोदगा, होनीहाळ बाळेकुंद्री खुर्द बाळेकुंद्री खुर्द, माविनकट्टी, बाळेकुंद्री बुद्रूक
सांबरा – सांबरा
मुतगा – मुतगा, निलजी शिंदोळी शिंदोळी, तारीहाळ, कोळीकोप्प, चंदनहोसूर
हलगा – हलगा, मास्तमर्डी, शगणमट्टी, बसरीकट्टी
बस्तवाड – बस्तवाड, कोंडसकोप्प, कमकारट्टी, के. के. कोप्प, नागेरहाळ, हालगीमर्डी
बागेवाडी – बागेवाडी, कोलारकोप्प, सिद्धनभावी भेंडिगिरी भेंडिगिरी, मुत्नाळ, विरपनकोप्प, कुकडोळ्ळी, अरळीकट्टी, बस्सापूर, हुलीकट्टी
अंकलगी – अंकलगी, हुलीकवी, बडस खुर्द, गजपती
धामणे (एस) – धामणे (एस), मासगोंडहट्टी, देवगोंडहट्टी, कुरबरट्टी, राजहंसगड, यरमाळ, सुळगे (येळ्ळूर)
येळ्ळूर – येळ्ळूर, अवचारहट्टी
देसूर – देसूर, झाडशहापूर, नंदीहळ्ळी, नागेनट्टी
संतीबस्तवाड – संतीबस्तवाड, वाघवडे, काळेनट्टी, वाघवडे पुनर्वसन केंद्र, मार्कंडेयनगर, रंगधोळी, गुत्ती, निंग्यानट्टी, नंदी ( नाविनहोळ ), केंचनट्टी (बैलूर)
बिजगर्णी – बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, यळेबैल, बेळवट्टी, बाकनूर, बडस इनाम, धामणे (एस) बैलूर
बेळगुंदी – बेळगुंदी, सोनोली, बोकनूर
मंडोळी – मंडोळी, हंगरगे, किणये, बहादरवाडी, रणकुंडे, नावगे, बामनवाडी, जानेवाडी, कर्ले, कुट्टलवाडी
बेनकनहळ्ळी – बेनकनहळ्ळी, ज्योतीनगर, गणेशपूर, सावगाव
हिंडलगा – हिंडलगा, विजयनगर
सुळगा (हिं) – सुळगा (हिं), कल्लेहोळ (खडी मशीन कॉलनी) तुरमुरी, बाची, कुद्रेमनी
उचगाव – उचगाव, कोनेवाडी, बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड
आंबेवाडी – आंबेवाडी, गोजगा, मण्णूर
कंग्राळी खुर्द – कंग्राळी खुर्द, अलतगा (खडी मशीन कॉलनी)

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.