लोकसभा पोटनिवडणूक – उमेदवारांच्या खर्च नियंत्रणासाठी एक्सपेंडिचर ऑब्सर्व्हर!-बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पडघम वाजले असून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल होण्यासदेखील सुरुवात झाली आहे.
बेळगावमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी दिग्गज नेत्यांची उपस्थिती दिसून येत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निवडणूक पार पडेपर्यंत अमाप पैसे खर्च करण्यात येतात.
निवडणूक आयोगातर्फे या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणजेच एक्सपेंडिचर ऑब्सर्व्हर म्हणून वरिष्ठ आयआरएस अधिकारी श्रीमती आर. गुलजार बेगम यांची नियुक्ती करण्यात आली असून आज बेळगावमध्ये त्यांचे आगमन झाले.
लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भातील कोणत्याही तक्रारी किंवा माहितीसाठी जनतेने स्थानिक दूरध्वनी क्रमांक ९४८११२३१३० आणि [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जनतेला खर्च निरीक्षकांशी भेटून चर्चा करावयाची असल्यास बेळगाव शहरातील जुन्या अतिथी गृहातील खोली क्रमांक ८ मध्ये दररोज सकाळी १० ते ११ यावेळेत भेट घेता येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.