मंगळवारी प्रसारित झालेल्या त्या राजकीय नेत्याच्या तथाकथित सीडी प्रकरणानंतर कर्नाटकच्या राजकीय क्षेत्रात घमासान सुरु झाले आहे.
आणखीन तीन बड्या नेत्यांच्या अत्याचाराच्या चित्रफीत आपल्याकडे असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहळ्ळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
नागरिक हक्क कार्यकर्ते दिनेश कल्लहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात कब्बन पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्याचबरोबर आणखीन तीन प्रभावी नेत्यांच्या चित्रफीत आपल्याकडे असल्याचे सांगून नव्याने खळबळ उडवून दिली आहे.
आपला वकीलां बरोबर चर्चा करून त्या चित्रफिती संदर्भात पुढील निर्णय जाहीर करू असे कल्लहळ्ळी यांनी सांगितले आहे.