Tuesday, April 23, 2024

/

सी डी प्रकरणातील ‘ती’ बेळगावचीच… प्रकरणाला नवे वळण

 belgaum

रमेश जारकीहोळी अश्लील सी डी प्रकरणी एक मोठा ट्विस्ट आला असून चित्रफितीत दिसलेल्या युवतीचे वडील कुवेम्पू नगरचे रहिवाशी प्रकाश कांचेर यांनी सदर मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार एपीएमसी पोलिसांत दिली आहे. गेल्या 2 मार्च रोजी सदर मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या अगोदर सदर तरुणीला विजापूर जिल्ह्यातील निडगुंडी येथे नोटीस देखील बजावली होती बेपत्ता युवतीने 34 सेकंदाचा व्हीडिओ देखील प्रसिद्ध केला होता आता त्या नंतर त्या मुलीचे बेळगाव कनेक्शन समोर आले असून अपरहरणाची तक्रार नोंद झाली आहे.

सदर युवतीचे आई वडील दोन भाऊ हे हनुमाननगर कुवेम्पू नगर भागात वास्तव्यास आहेत वडील खाजगी कंपनीत नोकरीला आहेत तिच्या कुटुंबातील सदस्यांनी अपहरण करणे,तिला गुप्त ठिकाणी ठेवणे,धमकावून अश्लील सी डी बनवणे, सी डी मीडियाला देणे, तिचा अपमान करणे,विनयभंग करणे आरोप केला आहे. बेळगावच्या ए पी एम सी पोलिसांनी आय पी सी 363,368,343,346, 354 आणि 506 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.