लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्याच्या निवडणूक जनरल ऑब्सर्व्हरपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ. चंद्रभूषण त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज बेळगावमध्ये त्यांचे आगमन झाले असून पोटनिवडणूक संदर्भातील तक्रारी आणि माहितीसाठी जनतेने ९४८०७७०८३० या मोबाईल क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव शहराच्या नव्या अतिथीगृहातील खोली क्रमांक ४ मध्ये दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत जनरल ऑब्सर्व्हर चंद्रभूषण त्रिपाठी यांची भेट घेता येईल, असे कळविण्यात आले आहे.