Friday, May 31, 2024

/

बेळगावमध्ये रविवारी भरणार हे महिला साहित्य संमेलन

 belgaum

हिंदवाडी येथील मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी आयोजित 34 वे महिला साहित्य संमेलन बेळगावमध्ये भरविण्यात येणार आहे.

रविवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघ सभागृहात हे संमेलन भरविण्यात येणार असून या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लेखिका व दिग्दर्शिका डॉ. संध्या देशपांडे या उपस्थित राहणार आहेत.

सदर संमेलन दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्रात संमेलनाचे उदघाटन आणि त्याचबरोबर संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित केली जाणार आहेत.

 belgaum

दै. तरुण भारतच्या पत्रकार मनीषा सुभेदार यांच्या उपस्थितीत स्मरणगाथा हे दुसरे सत्र संपन्न होणार आहे. यावेळी ” रत्नाकर मतकरी यांची कथा ” या विषयावर अक्षता आळतेकर-पिळणकर कथाकथन सादर करणार आहेत.

याच सत्रात काव्यगायन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत., मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा शोभा लोकूर यांनी ही माहिती दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.