वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्याला 90 टक्के शेतकऱ्यांचा विरोध आहे हे सिद्ध झाल्याने बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
तेंव्हा प्रांताधिकाऱ्यांनी बायपासमध्ये ज्यांची शेती गेली आहे, त्यांची आज बुधवारी 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता जी बैठक बोलावली आहे त्या बैठकीला संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन हणमंत बाळेकुन्द्री, प्रकाश नायक,राजू मरवे आदी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
हालगा-मच्छे बायपासला कायमच विरोध करत शेतकऱ्यांनी आपला लढा तीव्र केलाच आहे. त्यात उच्च न्यायालयाने सुध्दा बायपासचे भूसंपादन चुकिचे आहे. तसेच झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय या बायपास रस्त्याचे कोणतेही काम सूरु करु नये असा आदेशही दिला आहे.
तरीही त्या आदेशाचे उल्लंघन करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खाते व ठेकेदारने बळजबरीने काम सूरु केल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन करुन काम थांबविले होते. त्यानंतर प्रत्यक्ष जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संबधित अधिकाऱ्यांसह बायपासची पहाणी करुन जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांचा विरोध आहे हे सिध्द झाल्याने पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढू म्हणून सांगितले असतानां आता परत प्रातांधिकारी कार्यालयाने तलाठ्याकरवी मच्छे व हालगा येथील बायपासमध्ये ज्यांची शेती गेलीआहे, त्यांनी आज बुधवारी 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता हजर रहावे, असे सांगितले आहे.
तेंव्हा शेतकऱ्यांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष करावे आणि बैठकीला उपस्थित राहू नये, असे आवाहन रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी बायपासंबधी बैठकिचा सुतोवाच केल्याने त्या बैठकीनंतरच पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे. हे लक्षात घेऊन बायपास रस्त्यासाठी ज्यांची शेती जाणार आहे, त्या शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित राहू नये, असे संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.