Tuesday, July 23, 2024

/

सलग दुसऱ्या दिवशी अवैध दारूसाठा जप्त : बहाद्दरवाडीत पोलिसांची कारवाई

 belgaum

सलग दुसऱ्या दिवशी बेळगाव अबकारी खाते व पोलिसांनी धाड टाकून गोवा बनावटीच्या दारूचा अवैध साठा जप्त केला असून एकाला अटक केली आहे. काल मंगळवारी सीसीबीआय पोलिसांनी 13 लाखांची दारू जप्त केल्यानंतर आज बुधवारी पोलीस खात्याने धाड टाकून केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.

बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील
बहाद्दरवाडीत (ता. बेळगाव) गावामध्ये धाड टाकून पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारुचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव लक्ष्मण ऊर्फ बाळू सातेरी पाटील (वय 50, रा. ब्रह्मलींग गल्ली, भादरवाडी) असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडील बेकायदा दारू विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या दारूच्या 750 मिलीच्या 436 बाटल्या जप्त केल्या आहेत.

या अवैध दारूची किंमत 7,850 रुपये इतकी होते. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये आरोपीकडून 3 मोबाईल संच देखील जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.Arrack goa made

सीसीआयबी पोलिसांनी काल मंगळवारी हिंडलगा -विजयनगर येथील रक्षक कॉलनीमध्ये धाड टाकून 13 लाखांची बेकायदा दारू जप्त केली होती. याप्रकरणी दोघा जणांना अटकही करण्यात आली आहे.

या कारवाईनंतर आज सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी भादरवाडीत दारूचा अवैध साठा जप्त केल्यामुळे आगामी लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने अवैध दारू विरुद्ध मोहीम उघडल्याचे दिसून येते. अबकारी व पोलीस खात्याच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.