Sunday, April 28, 2024

/

दुरुस्तीनंतर “हे” रेल्वे गेट बनलय वाहतुकीसाठी अधिकच खडतर

 belgaum

टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटची दुरुस्ती केल्यानंतर येथील मार्ग सुकर होण्यावर होण्याऐवजी अधिकच खडतर झाला असल्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटची नुकतीच दुरूस्ती करण्यात आली आहे. दुरुस्तीच्या कामानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरलेल्या वाळूमुळे दुचाकीस्वार आणि ऑटोरिक्षा चालकांसह कार चालकांना देखील हे गेट ओलांडणे कठीण जात आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन आज अरुण थिएटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती. रेल्वे मार्गाच्या ठिकाणी पसरलेल्या वाळूमुळे या ठिकाणी अपघाताचे प्रकार देखील घडत असून आज सकाळी दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन महिला या ठिकाणी पडल्या. तेंव्हा रेल्वे खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पहिले रेल्वे गेट येथील वाहतुकीस निर्माण होणारा अडथळा दूर करून मार्ग सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.