Friday, April 19, 2024

/

प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे एफडीए परीक्षा लांबणीवर

 belgaum

राज्यातील विविध विभागातील रिक्त पदांसाठी रविवार दि. २३ जानेवारी आणि सोमवार दि. २४ जानेवारी रोजी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.

रविवारी केपीएससीच्या प्रथम श्रेणी सहाय्यक पदासाठी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. काही दुष्कर्मीनीं या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडल्या असून या कारणास्तव या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२०१९ सालापासून रिक्त असलेल्या राज्यातील अनेक विभागाच्या जागा भरण्यासाठी या स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या.

रविवार आणि सोमवार अशा दोन विभागात या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या परीक्षांच्यय प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कर्नाटक लोकसेवा आयोगाचे सचिव जे. सत्यवती यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.