Friday, January 3, 2025

/

केस गळणे-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

मानवाची निर्मिती पूर्ण झाल्यावर बहुदा फक्त सौंदर्य प्रदान करण्यासाठी डोक्यावर केसांची रचना केली गेली असावी.
त्वचेवरील छिद्रातून म्हणजे केसपुटकांतून केस उगवतात. केरॅटीन या प्रथिनापासून केस बनतात.

केसपुटकांच्या खालील केशमुळांपाशी विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात. या पेशी अमिनोआम्लांचे केरॅटीनमध्ये रूपांतर करतात. केशमुळांपासून केस त्वचेबाहेर येतो. ज्या प्रमाणात या अमिनो आम्लांचे किरॅटीनमध्ये रूपांतर होते. त्याच प्रमाणात आपल्या केसांची 12 से. मी. एवढी वाढ होते. 15 ते 30 वयोगटात केसांची वाढ जोमाने होत असते.
कारणे आणि लक्षणे
पोषणमुल्यांचा अभाव हे केस गळण्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे. आपल्या आहारातून शरीराला कुठल्याही क्षाराचा किंवा खनिजाचा पुरवठा कमी झाला तरी केस गळू लागतात. तरी केस गळू लागतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील बी- 6 हे जीवनसत्व कमी झाले तर त्याचे केस गळतात. व्यक्तीमध्ये फॉलीक अ‍ॅसिडची पूर्णपणे कमतरता होते. तेव्हा त्या व्यक्तीला टक्कल पडते. परंतु ही जीवनसत्वे शरीराला पुन्हा मिळाली की पुन्हा केसांची वाढ होते. काळजी, चिंता, अचानक घडलेल्या गंभीर घटना यांचा शरीरावर परिणाम होऊन केस गळतात. फ्ल्यु विषमज्वर, अशक्तपणा, जुनाट सर्दी इत्यादी आजारांमुळे केस कमी होतात. केसांची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यास केसांची मुळे कमकुवत होतात. केसांच्या मुळाशी मळ, घाण साठून केस गळतात. किमोथेरपी, काही औषधांचे ओव्हरडोस, कर्करोग, एड्स तत्सम विकार यामध्येही केस गळतात. बुरशीमुळे चाई पडे. प्रसूतीपश्‍चातही केस गळतात. अनुवांशिकतेमुळेही टक्कल पडू शकते.

hair-loss-medicines
उपचार
डोक्याला मालिश- प्रथम केस गार पाण्याने धुवून घ्यावेत. त्यानंतर खोबरेल तेल कोमट करून घेऊन बोटांनी केसांच्या मुळाशी चांगले मालिश करावे. आंतरत्वचेमध्ये असलेल्या तैलग्रंथी चांगल्या मोकळ्या होऊन त्यातूनही तेल पाझरते व रक्तााभिसरण चांगले होते. या सर्वांचा एकत्रित परिणा म्हणून केसांचे आरोग्य सुधारते. हा उपाय आठवड्यातून दोनवेळा करावा.
कडुनिंब- कडुनिंबाची पाने पाण्यात उकळावीत त्यामुळे कडुनिंबाचा अर्क पाण्यात उतरतो. या पाण्याने केस धुतल्याने केस गळणे थांबते. तसेच केसांचा काळेपणा टिकून राहतो. केस वाढण्यास मदत होते. शिवाय केसाताील उवा किंवा इतर उपद्रवी कृती कीटक मरतात. केस निरोगी राखण्यासाठी कडुनिंबाचा उपचार उपयुक्त आहे.

इतर- आवळ्याचा रस, पालक रस, लिंबुचा रस, लसूण पातीचा रस हे रस पोटात घेण्याने केस गळणे थांबते.
लिंबु मिरी उपचार- लिंबाच्या बिया व काळी मिरी एकत्र करून वाटावी. त्यात किंचित पाणी घालून लेप तयार करावा व केस नसलेल्या जागी लावावा. या लेपामुळे थोडीशी आग होते. परंतु काही दिवसातच नवीन केस येऊ लागतात.

ज्येष्ठमध- ज्येष्ठमध दुधात उगळावा. त्यात चिमूटभर केशर टाकावे व चाईवर हा लेप लावावा.
कांदा- कांद्याच्या रसामुळेही चाईवर केस येतात.
होमिओपॅथी- डोक्यावर औषधे लावणे, लेप लावणे यामुळे फायदा होतोच परंतु पूर्णतः उपचार मात्र होमिओपॅथीमुळेच होतात. मूळ कारणावर उपचार केल्याने केस गळणे पूर्ण बंद होते. शिवाय होमिओपॅथीक सौंदर्यप्रसाधनांच्या कायम वापराने केस दाट, मुलायमव सुंदर होतात.
अ‍ॅसीड फ्युर- केस तुटक, दुभंगलेले असतात. केसांची चमक जाऊन रूक्ष होतात.
फॉस्फरस- कोंडा भरपूर असून केस खूप गळतात. केस झुपक्याने गळून चाई पडते. व्यक्ती अशक्त दिसते.
मेझेरियम- केस चिकट तुटक होतात. डोक्यात खूप खाज, कोंडा साचून केस गळतात.
आहार- ज्या व्यक्तींमध्ये केस गळण्याची प्रवृत्ती असते त्यांनी संतुलित आहार घेणे आवश्य असते.
Call for appointment
9916106896
9964946918

केस गळती आणि टक्कल पडणे यावर उपचार काय?काय सांगतात बेळगावच्या प्रसिद्ध डॉ सोनाली सरनोबत पहा खालील व्हीडिओत
#hairfall
#healthtips
#drsonalisarnobat
#livebelgaum

https://www.facebook.com/375504746140458/posts/1315748555449401/

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.