Thursday, May 9, 2024

/

जिल्ह्यात 8 लाख लसींच्या स्टोअरेजची क्षमता : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात कोरोनावरील 8 लाख लसींचे स्टोअरेज अर्थात साठा करण्याची क्षमता असून सर्वसामान्य रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत कोरोना लसीकरण केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.

कोरोनावरील लसीकरणाची ड्राय रन अर्थात रंगीत तालीम आज शनिवारी बेळगांवसह देशभरात पार पडली. या रंगीत तालमीच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी आज सकाळी शहरानजीकच्या वंटमुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले की कर्नाटकात बेळगावसह बेंगलोर शहर, गुलबर्गा म्हैसूर आणि शिमोगा जिल्ह्यांची कोरोनावरील लसीकरण्याच्या ड्राय रनसाठी निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने बेळगाव जिल्ह्यात वंटमुरी प्राथमिक आरोग्य केंद्र , कित्तूर कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि हुक्केरी तालुका हेल्थ सेंटर अशा तीन ठिकाणी ही ड्राय रन अर्थात लसीकरणाची रंगीत तालीम होईल. यासाठी जिल्हा आरोग्य खात्याने प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कोरोनावरील लसीकरणाची रंगीत तालीम चार टप्प्यात केले जाणार आहे. यामध्ये लसीकरणासाठी कशा पद्धतीने नोंदणी केली जावी, त्यानंतर कशा पद्धतीने त्याची छाननी केली जावी आणि छाननीनंतर प्रत्यक्ष लसीकरण कसे केले जावे, तसेच लसीकरण केलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवणे या टप्प्यांचा समावेश असणार आहे.

बेळगाव जिल्ह्यात कोरोनावरील 8 लाख लसींचा साठा करण्याची क्षमता असून त्यासाठी डीप टेंपरेचर आणि विशिष्ट तापमान असलेली स्टोरेज व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आशा कार्यकर्त्यांना कोरोना वरील लस दिली जाईल. त्याचप्रमाणे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्थित विभागणी करून लसीकरणा दरम्यान सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील घेतली जाईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली दिली.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.