Saturday, December 21, 2024

/

काँग्रेस नेत्यावर गोळीबाराद्वारे प्राणघातक हल्ला : दोघे जखमी

 belgaum

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्ध्यावर चक्क गोळीबार करण्यात आल्याची घटना  यमकमर्डी येथें घडली असून यामध्ये एका काँग्रेस नेत्यासह दोघेजण जखमी झाले आहेत.

सदर गोळीबाराच्या घटनेनंतर जखमींना बेळगांव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाच्या छातीच्या वरच्या बाजूला गोळी लागल्यामुळे दैव बलवत्तर म्हणून तो बचावला आहे.

दोघेही जखमी काँग्रेस पक्षाचे असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्यामुळे विरोधी गटातील काहींनी त्यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या असाव्यात अशी शक्यता वर्तविली जात आहे.

गोळीबार कोणत्या कारणास्तव झाला? आणि हल्लेखोर कोण आहेत? याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या खुनी हल्ल्यात देशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर करण्यात आला असावा असा कयास असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा केला जाईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक निंबरगी यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.