Sunday, December 22, 2024

/

डीसीसी बँक नूतन अध्यक्षपदी रमेश कत्ती तर उपाध्यक्ष ढवळेश्वर

 belgaum

बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) नूतन अध्यक्षपदी रमेश कत्ती आणि उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या पद्धतीने रमेश कत्ती पांचव्यादा डीसीसी बँकेचे अध्यक्ष बनले आहेत

बेळगांव सरकारी विश्रामधाम येथे हे आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी उपरोक्त माहिती दिली.

जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यंदा आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे यावेळीची या बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजप पक्षाच्या वरिष्ठांची इच्छा होती.Ramesh katti

त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्या अनुषंगाने यावेळी बँकेच्या नूतन अध्यक्षपदी रमेश कत्ती व उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर यांची निवड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री सवदी यांनी स्पष्ट केले.

रमेश कत्ती हे सातत्याने बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असण्याबरोबरच चार वेळा बँकेचे अध्यक्ष देखील होते. त्यामुळे त्यांच्या गाठीशी मोठा अनुभव असून यावेळी देखील ते आपली अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळतील, असा विश्वास भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे.

https://www.facebook.com/375504746140458/posts/1259743637716560/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.