बेळगाव दक्षिण भागाला मंगळवारी पाणी पुरवठा नाही

0
 belgaum

पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती लागल्याने बेळगाव दक्षिण विभागातील शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, खासबाग या विभागाच्या पाणी पुरवठात २४ नोव्हेंबर रोजी व्यत्यय येणार आहे. नागरिकांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाने केले आहे.

बेळगाव शहराच्या दक्षिण विभागातील घुमटमाळ जलाशयातील ४०० मीटर व्याप्तीतील बसवेश्वर सर्कलपासून चंपाबाई बोगले, बालिका आदर्श शाळेच्या इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.

bg

यासाठी दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. यामुळे २४ नोव्हेंबर रोजी शहराच्या दक्षिण भागातील शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, खासबाग या विभागात पाणी पुरवठा होणार नाही.

नागरिकांनी याची दाखल घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा मंडळाचे सहायक कार्यकारी अभियंता यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.