Sunday, April 28, 2024

/

कंग्राळी खुर्द ते अलतगा क्रॉस रस्त्याचे डांबरीकरण

 belgaum

बेळगाव तालुक्यातील यमकनमर्डी मतदार संघातील आणि कंग्राळी ग्रामपंचायत हद्दीतील कंग्राळी खुर्द ते अलतगा क्रॉस पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ आज विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदार निधीतून 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून रस्त्याची डागडुजी आणि डांबरीकरणासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.

यावेळी जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, ग्रा. पं. सदस्य चेतन कांबळे, देवस्की पंच कमिटीचे मलगौडा पाटील, इंजिनियर बन्नूर, कंग्राळी ग्रामपंचायत पीडिओ, इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.