Tuesday, April 30, 2024

/

अखेर बेळगावमध्ये होणार फ्लाईंग स्कुल

 belgaum

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने फ्लाईंग स्कुलची स्थापना करण्यात येत आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या या फ्लाईंग स्कुल अंतर्गत वैमानिक प्रशिक्षण देण्यात येणार असून यामध्ये बेळगावचाही समावेश आहे. बेळगावमध्ये होणाऱ्या फ्लाईंग स्कुलसाठी जमीन भाडेतत्वावर/लीजवर घेण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने निविदा मागविल्या आहेत. या फ्लाइंगस्कुलच्या ठिकाणांमध्ये बेळगाव, जळगाव, कलबुर्गी, खजुराहो, लिलाबरी आणि सालेम येथील विमानतळांचा समावेश आहे.

एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने मिनीरत्न श्रेणी -१ या पब्लिक सेक्टर इंटरप्रायझेसची संसदेच्या अधिनियमाने स्थापना करण्यात आली असून हे पब्लिक सेक्टर इंटरप्रायझेस 1 एप्रिल १९९५ रोजी अस्तित्वात आले आहे. पूर्वीचे राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यांचे विलीनीकरण करण्यात आल्यानंतर आत्म निर्भर भारत या पंतप्रधानांनी सुरु केलेल्या उपक्रमाच्या अनुषंगाने भारतातील हवाई परिवहन संघटनेला प्रोत्साहन देण्यासाठी या फ्लाईंग स्कुलची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी मार्गदर्शक तत्वे आणि धोरणे तयार करण्यात आली आहेत.

एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन अरविंद सिंग यांनी नवी दिल्ली येथे ऑक्टोबर २०२० मध्ये सरकारने सहा विविध ठिकाणी हे फ्लाईंग स्कुल उभारण्यासाठी मान्यता दिली असल्याचे सांगितले होते. या सहा विमानतळामध्ये बेळगाव, जळगाव, कलबुर्गी, खजुराहो, लिलाबरी आणि सालेम येथील विमानतळांचा समावेश आहे, अशीही माहिती त्यांनी दिली होती.

 belgaum

कर्नाटकचे तत्कालीन उड्डाणमंत्री जयंत सिंह यांनी बेळगावमध्ये हे फ्लाईंग स्कुल स्थापण्यासाठी प्रयत्न केले होते. २०१८ साली बेळगावमध्ये फ्लाईंग स्कुल स्थापण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. बेळगावमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने हे फ्लाईंग स्कुल बेळगावमध्ये स्थापन व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. अखेर बेळगावमधील फ्लाईंग स्कुल साठी निविदा निघाल्या असून येत्या कालावधीत बेळगावच्या शिरपेचात आणखी एका सुविधेचा तुरा रोवला जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.