Friday, December 20, 2024

/

जिलेटीन स्फोटात मोटारसायकलस्वार जागीच ठार

 belgaum

जिलेटिन हे स्फोटक घेऊन जाणार्‍या मोटरसायकलची ट्रॅक्टरला जोरदार धडक बसून झालेल्या जिलेटीन स्फोटात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बिडी गावानजीकच्या माचीगड क्रॉस येथे आज सकाळी घडली.

बिडी (ता. खानापूर) गावानजीकच्या माचीगड क्रॉस येथे जिलेटिन घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मोटरसायकल स्वाराने ट्रॅक्टरला धडक दिल्यामुळे जिलेटिनचा स्फोट झाला. आज बुधवारी सकाळी घडलेल्या या अपघाती स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की मोटरसायकल स्वार युवकाच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले. मयत युवकाचे अवयव अपघातस्थळी विखरून पडले होते.

अपघातात जागीच ठार झालेला युवक हा मूळचा शिमोगा येथील आहे अपघाताची माहिती मिळताच नंदगड आणि खानापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच तपास कार्य हाती घेतले आहे.Jilletine death

बिडी परिसरात शिमोगा येथील लोकांचे वास्तव्य आहे. या लोकांकडून नजीकच्या जंगल परिसरातील पाणवठ्याच्या ठिकाणी स्फोटकांचा वापर करून जंगली प्राण्यांची शिकार केली जाते.

अपघातात ठार झालेल्या युवक त्यासाठीच जिलेटीन घेऊन जात असावा असा कयास आहे. तथापि जिलेटिन सारखे स्फोटक त्याच्याकडे कोठून आले? तसेच या जिलेटिनचा नेमका कशासाठी वापर करण्यात येणार होता? या अनुषंगाने पोलीस तपास सुरू आहे. नंदगड पोलीस ठाण्यात उपरोक्त अपघाताची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.