मराठा विकास निगम आणि वीरशैव लिंगायत विकास निगम मागोमाग आता राज्यात वक्कलिग अभिवृद्धी महामंडळाची स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यात मराठा विकास निगम निर्माण केल्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी वीरशैव लिंगायत विकास निगमची स्थापना केली. स्थापनेनंतर वीरशैव लिंगायत विकास निगमला मुख्यमंत्र्यांनी 500 कोटी रुपयांचे तर मराठा विकास निगमला 50 कोटी रुपयांचे अनुदानही दिले आहे. या दोन विकास निगमांच्या स्थापनेनंतर आता राज्य सरकारकडे वक्कलिग अभिवृद्धी महामंडळाची देखील स्थापना करावी अशी मागणी केली जात आहे.
लिंगायत समाज आणि वक्कलिग समाज हे दोन्ही समाज कर्नाटक राज्यातील अतिशय प्रबळ समाज आहेत. त्यामुळे वीरशैव लिंगायत विकास निगमची स्थापना होताच आता वक्कलिग अभिवृद्धी महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बेळगांव विमानतळावर उपमुख्यमंत्री अश्वत नारायण यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली असून या मागणीला माझा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
हिंडलगा जेल मध्ये बंदिस्त असलेले काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांनी दूरध्वनी वरून अनेकांशी संपर्क साधला आहे याबाबत विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार देत याबाबत आपणास कल्पना नसल्याचे नमूद केले.
कॉलेज सुरू करण्यासाठी पालकांची विद्यार्थ्यांची मागणी होती यासाठी ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत स्व इच्छेने आलेल्या विद्यार्थ्यांना ऑफ लाईन क्लास सुरू केले आहेत.तपासणी वेळी कोविड पोजिटिव्ह आलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांना कॉलेज मध्ये बसण्यास अनुमती असणार नाही असेही ते म्हणाले.