Friday, March 29, 2024

/

नवविवाहित युवतीची आत्महत्या..

 belgaum

अवघ्या तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या एका तरुणीने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सुळगा -हिंडलगा येथे आज बुधवारी सकाळी उघडकीस आली.

ज्योती निखिल चोपडे (वय 19, रा. उचगांव) असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित येथे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे निश्चित कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. गेल्या तीन महिन्यापूर्वी ज्योतीचा उचगांव येथील निखिल चोपडे या युवकाशी विवाह झाला होता.

गेल्या दोन -चार दिवसांपासून ती लक्ष्मी गल्ली सुळगा हिंडलगा येथे आपल्या माहेरी राहण्यास आली होती. ज्योतीची आई परगांवी गेली आहे.

 belgaum

नवरा आणि वडील कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आज सकाळी ज्योतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील घरी परतल्यानंतर आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच मृतदेह शवचिकित्ससाठी जिल्हा रुग्णालयाकडे धाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.